Fri, Apr 26, 2019 15:48होमपेज › Nashik › नाशिक : टँम्पोने टोल कर्मचाऱ्याला उडवले; घोटी टोलनाका बंद

नाशिक : टँम्पोने टोल कर्मचाऱ्याला उडवले; घोटी टोलनाका बंद

Published On: Dec 15 2017 11:10AM | Last Updated: Dec 15 2017 11:21AM

बुकमार्क करा

नाशिक : पुढारी ऑनालईन 

नाशिक येथील घोटी येथील टोल नाक्यावर टेम्पो चालकाने टोल कर्मचारी योगेश गोवर्धन यांना टँम्पोने उडवले. ही धडक इतकी जोरदार होती की  योगेश गोवर्धन यांचा जागीच मृत्यू झाला. 

या सर्व धक्कादायक प्रकारामुळे संतप्त टोल कर्मचाऱ्यांनी गेल्या १२ तासांपासून घोटी टोल नाका बंद पाडला आहे. योगेश गोवर्धन यांच्या मृत्यूनंतर टोल कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु केले.

दरम्यान त्या टँम्पो चालकाला लवकरात लवकर पकडण्यात यावे अशी मागणी केली. योगेश गोवर्धनेचा मृतदेह हलविण्यास कुटुंबियांनी नकार दिला.