Thu, Apr 25, 2019 23:41होमपेज › Nashik › सिडकोतील माय-लेकाचा अपघातात मृत्यू

सिडकोतील माय-लेकाचा अपघातात मृत्यू

Published On: Aug 30 2018 1:22AM | Last Updated: Aug 30 2018 1:03AMसिडको : प्रतिनिधी

मुंबई-आग्रा महामार्गावर डेक्‍कन पेट्रोलपंपासमोर उड्डाणपुलावर रस्ता ओलांडतांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने माय-लेक ठार झाले. या अपघातात अन्य दोन जखमी झाले आहेत. याबाबत रात्री उशिरापर्यंत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अपघाताची माहिती मिळताच सुंदरबन कॉलनी भागात हळहळ व्यक्‍त केली जात आहे.

बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शीतल आशिष तांबट (30, रा.  गोपाल कृष्ण चौक) या मुलगा  कुणाल तांबट (4), सासरे सुभाष चुनीलाल तांबट (55), शीतलची आई यशोदा भटुलाल कासार (65), भटुलाल लालचंद कासार (68) हे सर्व दुपारी कामानिमित्त नाशिकला गेले होते. यानंतर सायंकाळी ते सिडकोकडे निघाले. यावेळी कमोदनगर येथे आले. कमोदनगर येथून उड्डाणपुलावरून सिडकोकडे येत असतांना मुंबईकडून नाशिककडे वेगाने जाणार्‍या अज्ञात वाहनाने त्यांना पुलावर धडक दिली. त्यात शीतल तांबट व त्यांचा 4 वर्षाचा मुलगा कुणाल  हे जागीच ठार झाले. तर, यशोदा कासार यांच्या पायावरून वाहनाचे चाक गेल्याने त्या जखमी झाल्या. सुभाष तांबट हे देखील गंभीर जखमी झाले. भटूलाल कासार यांनी रस्ता ओलांडल्यामुळे ते बचावले. घटनेनंतर चालक वाहनासह  फरार झाला.