Tue, Sep 25, 2018 04:50होमपेज › Nashik › नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर भीषण अपघातात दोन ठार

नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर भीषण अपघातात दोन ठार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

त्र्यंबकेश्‍वर : वार्ताहर

नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर सोमवारी सकाळी 7.15 वाजेच्या सुमारास नाशिकहून मोखाड्याला जात असलेली क्‍वीड कार (क्र. एमएच-04-एचयू-1604) व छोटा हत्ती (क्र. एमएच-48-एवाय-1835) रिकामे क्रेट्स घेऊन नाशिककडे जात असताना खंबाळे शिवारात वाहनतळाजवळ समोरासमोर भीषण अपघात झाला. या घटनेत दोन्हीही वाहनांचे चालक जागीच ठार झाले. तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले. 

त्र्यंबक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघात घडल्यानंतर सर्व जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यातील कारचालक सुरेश धोंडू ठोंबरे (39, रा. ट्रॅक-34, चौथा मजला, आनंद हेरिटेज, अंबड, कामटवाडे) व दुसर्‍या वाहनाचा चालक (नाव समजले नाही) असे दोघे मयत झाले. जखमींमध्ये श्यामराव पुंडलिक नवसात (45, कामठवाडे), सुवर्णा सुरेश देवरे (45, कामटवाडे), किरण सोमनाथ देवरे (34, कामटवाडे) व दिलीप श्यामराव शिंपी (51, रा. सातपूर) यांचा समावेश आहे. यात कारचा चक्‍काचूर झाला आहे. 

Tags : Nashik, Nashik News, accident, Nashik, Trimbak road, two peoples died


  •