Mon, Apr 22, 2019 15:38होमपेज › Nashik › रोख पैसे पाहिजे असेल तर आडत कापून घेणार व्यापाऱ्यांचा दम 

रोख पैसे पाहिजे असेल तर आडत कापून घेणार व्यापाऱ्यांचा दम 

Published On: Mar 24 2018 8:14PM | Last Updated: Mar 24 2018 8:14PM नांदगाव  (नाशिक) : प्रतिनिधी 

 जळगाव बुद्रुक वार्ताहर 'रोख पैसे पाहिजे असेल तर आडत कापून द्यावी लागेल.! अन्यथा धनादेश कधी वटला जाईल, याची काही शास्वती नाही. असा गर्भित दम देत व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत असल्याची गंभीर घटना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घडत आहे. 

राज्य सरकारने शेतकरी हिताचा आडत बंदचा निर्णय घेऊन मोठा कालावधी उलटून गेला असला, तरी सरकारी निर्णयालाच आव्हान देण्याचा गंभीर प्रकार आहे. याबाबत अधिक असे की, येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना रोख ३ हजार रुपये व उर्वरीत रकमेचा धनादेश असे संचालक मंडळ बैठकीत यापूर्वीच ठरले आहे. मात्र जास्त अडचण असलेले शेतकरी मोठी रक्कम रोख स्वरूपात मागतात, म्हणून या गोष्टीचा फायदा व्यापारी वर्गाने उचलला आहे. ज्या शेतकऱ्यांना अशी अडचण येते त्याच्याकडून धान्य साठी शेकडा ३ रुपये व कांदा पिकासाठी शेकडा ४ रुपये आडत कापून घेतली जात असल्याची गंभीर तक्रार नांदगाव बाजार समितीच्या कार्यालयात दाखल झाली आहे. दरम्यान आडत कापून दिली तर संपूर्ण रक्कम रोख स्वरूपात मिळते, आणि धनादेश घेतला तर तो अनेक वेळा खात्यावर शिल्लक नसल्याच्या कारणाने बाऊन्स होतो किंवा होल्ड करून ठेवला जातो. मग रोख द्यायला पैसे असतात आणि धनादेश दोन-दोन महिने वटत नाही. हा प्रकार न समजण्या इतके शेतकरी मूर्ख नाहीत. असे वर्गाचे म्हणणे आहे. थेट राज्य शासनाला आव्हान देणाऱ्या या व्यापाऱ्यांची चौकशी होऊन कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.