Fri, Apr 26, 2019 03:23होमपेज › Nashik › सहायक आयुक्‍त कार्यालयावरच जिल्हा परिषदेने मानली धन्यता

सहायक आयुक्‍त कार्यालयावरच जिल्हा परिषदेने मानली धन्यता

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 27 2018 11:11PMनाशिक : प्रतिनिधी

ज्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी गरीब, होतकरू मुलांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली, त्याच शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त स्वतंत्रपणे कार्यक्रम राबविण्याऐवजी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्येच सहभागी होण्यास धन्यता मानली. विशेष म्हणजे, मागासवर्गीय घटकांसाठी बहुतांश योजना समाजकल्याण विभागामार्फतच राबविल्या जात आहे.

शाहू महाराजांनी बहुजन समाजातील शिक्षण प्रसारावर दिला. बहुजन समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. जातियता नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या भरविल्या जाणार्‍या शाळा बंद केल्या.आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा शाहू महाराजांनीच केला. सद्यस्थितीत विविध शिष्यवृत्ती असो कि, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान आदी विविध प्रकारच्या योजना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फतच राबविल्या जात आहे. त्यामुळे या विभागाने शाहू महाराजांचा जयंतीदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करताना विविध उपक्रम राबविणे आवश्यक होते. प्रत्यक्षात मात्र जिल्हा परिषदेत केवळ प्रतिमापूजन करण्यापलीकडे फार काही या विभागाने केले नाही. उलट समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्याइतपतच धन्यता मानली. जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते केटीएचएम महाविद्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीत समाजकल्याण विभागाने वाहून घेतले. सहाय्यक आयुक्त कार्यालयाला कार्यक्रम राबविण्यासाठी एक लाख रूपयांची तरतूद होती. त्यांनी या तरतूदीतून जे काही कार्यक्रम राबविले त्यात सहभागी होण्याव्यतिरिक्त अन्य कार्यक्रम राबविला नाही, अशी कबुली समाजकल्याण विभागाने दिली. म्हणजे, स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करून अस्तित्व जपण्याऐवजी सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्रमावरच समाधान मानून हा विभाग मोकळा झाला.