Tue, Mar 19, 2019 09:15होमपेज › Nashik › डेकाटेंचा आरोग्य अधिकारीपदाचा मार्ग मोकळा

डेकाटेंचा आरोग्य अधिकारीपदाचा मार्ग मोकळा

Published On: Jun 29 2018 12:05AM | Last Updated: Jun 28 2018 11:28PMनाशिक : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारीपदावर डॉ. विजय डेकाटे यांची झालेली नेमणूक योग्य असल्याचा निकाल मॅटने दिला आहे. दरम्यान, डेकाटे यांना उद्याच्या उद्या कामावर रुजू करून घेण्याचे निर्देश जिपच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी गुरुवारी (दि.28) प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे निकाल जिल्हा परिषद प्रशासनासाठी चपराक मानली जात आहे. 

तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशिल वाकचौरे यांची भंडारा येथे बदली करतानाच त्यांच्या जागी पुण्याचे आरोग्य सहायक संचालक डॉ. डेकाटे यांची नियुक्ती सरकारने गत महिन्यात केली होती. मात्र, आरोग्य अधिकारीपदावर मुदत वाढ मिळावी. यासाठी डॉ. वाकचौरे हे सरकार दरबारी चकरा मारत होते. त्यातच पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही डॉ. डेकाटे यांना रूजू करून घेऊ नये, यासाठी जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांना पत्र धाडले होते.

दरम्यान, बदलीचे आदेश प्राप्त होऊनही गिते हे डेकाटेंना सेवेत सामावून घेण्यासाठी टाळाटाळ करत होते. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही डॉ. डेकाटे यांना सेवेत घेण्यावरून बरेच वादविवाद झाले होते. दरम्यान, सरकारने आदेश देऊनही सेवेत सामावून घेतले जात नसल्याने डॉ. डेकाटे यांंनी सरतेशेवटी मॅटचा दरवाजा ठोठावला होता. दरम्यान, मॅटमध्ये गुरुवारी (दि.28) झालेल्या सुनावणीदरम्यान, दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतानाच डॉ. डेकाटे यांच्या बाजूने निकाल दिला. 

डॉ. डेकाटे यांच्या प्रकरणावर मॅटमध्ये झालेल्या सुनावणीचा निकाल हाती आलेला नाही. हा निकाल हाती आल्यानंतरच पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल. याबाबत संबंधित यंत्रणेकडून माहिती घेण्यात येईल.  -अनिल लांडगे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ?परिषद