Mon, May 27, 2019 08:50होमपेज › Nashik › सिन्‍नरचे कवी कांगणे यांच्यासह तिघांना ‘विशाखा’ पुरस्कार

सिन्‍नरचे कवी कांगणे यांच्यासह तिघांना ‘विशाखा’ पुरस्कार

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 23 2018 11:15PMनाशिक : प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक व साहित्य या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदा साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ‘विशाखा’ पुरस्कार नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील कवी रवींद्र कांगणे, ठाण्याचे सुशीलकुमार शिंदे व सांगली येथील कवयित्री डॉ.सुनीता बोर्डे -खडसे यांना जाहीर झाला आहे. कुलगुरु प्रा.ई.वायूनंदन यांनी विशाखा, रुक्मिणी व श्रमसेवा पुरस्कारांची शुक्रवारी घोषणा केली.

गंगापूररोड येथील शगून हॉलमध्ये मंगळवारी (दि.27) सायंकाळी पाच वाजता  कवी किशोर पाठक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील. उपेक्षित महिलांसाठी झटणार्‍यांना दिला जाणारा श्रमसेवा पुरस्कार नाशिकच्या स्मशानभूमीत काम करणार्‍या सुनीता पाटील यांना दिला जाणार आहे. तर, रुक्मिणी पुरस्कार हा वैदू समाजासाठी काम करणार्‍या दुर्गा मल्लू गुडीलू यांना जाहीर झाला आहे. त्यांनी समाजातील 112 शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल केले. समाजातील महिलांचे 58 बचत गट स्थापन करुन त्यांना प्रौढ शिक्षण अभियानाअंतर्गत साक्षर करण्याचा प्रयत्न केला. 

या महिला मुंबईतील हॉटेल्ससाठी रोज तीन हजार चपात्या बनवून देणे, टिफिन सर्व्हिस देण्याचे काम करतात.रोख 21 हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या दोन्ही पुरस्काराचे स्वरुप आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठान व मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यामाने कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या नावाने दिला जाणारा ‘विशाखा ’पुरस्कार ठाणे येथील सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘आत्महत्या करायचं म्हणतयं’ या काव्यसंग्रहास प्रदान केला जाणार असून, त्यांना प्रथम क्रमांकांचे रोख 21 हजार रुपयांचे पुरस्कार दिला जाईल. द्वितीय 15 हजार रुपयांचा पुरस्कार हा नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील रवींद्र कांगणे यांच्या ‘येठण’ या काव्यसंग्रहास दिला जाईल. तर, सांगली येथील कवियत्री डॉ.सुनीता बोर्डे - खडसे यांच्या ‘अस्तिवाचा अंजिठा कोरताना’ या काव्यसंग्रहास तृतीय क्रमाकांचा दहा हजार रुपयांचा पुरस्कार प्रदान केला जाईल.