Mon, Mar 25, 2019 02:59
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › कामगार संघटनेच्या राज्य अध्यक्षाकडून कामगारास मारहाण

कामगार संघटनेच्या राज्य अध्यक्षाकडून कामगारास मारहाण

Published On: May 26 2018 1:47PM | Last Updated: May 26 2018 1:47PMनाशिक : प्रतिनिधी

कामगार संघटनेमध्ये सहभागी होत नसल्याच्या कारणावरुन सिअर्स कंपनीतील कामगारास मारहाण करणाऱ्या चौघा संशयित कामगारांसह सिटू कामगार युनियनचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्यावर सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मारहाण करण्यात आलेल्या प्रवीण मेहेटकर यांच्या फिर्यादीवरून दि.२५ मे रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. २३ बुधवारी रोजी सिअर्स कंपनीतील कामगार प्रवीण मेहेटकर (वय 39, रा.कुबेर दर्शन अपार्टमेंट,अशोकनगर, सातपूर ) हे रात्री साडेसात वाजता कंपनीतून घरी जात होते. यावेळी शिवाजीनगर कार्बन नाका चौकात नॅश ग्रुपच्याच सिम इंजिनिअरींगमधील कामगार वैभव जगताप, दीपक पाटील, अनिल शार्दुल, रोहित भालेराव आणि त्यांच्या सात ते आठ साथीदारांनी प्रवीणला आडवून बेदम मारहाण केली. तो जखमी झाल्याने त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

सिटू युनियनचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या सांगण्यावरुन मारहाण केली असल्याची तक्रार मेहहेटकर यांनी केली आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे करीत आहेत.