Mon, May 20, 2019 10:57होमपेज › Nashik › प्रेयसीशी लग्‍न करण्यासाठी पत्नीला पाजले विष

प्रेयसीशी लग्‍न करण्यासाठी पत्नीला पाजले विष

Published On: May 07 2018 2:03AM | Last Updated: May 06 2018 11:21PMनांदगाव : प्रतिनिधी

पत्नीशी पटत नाही व प्रेयसीसोबत लग्‍न करण्याची संमती मिळत नाही म्हणून पतीने पत्नीला विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नांदगाव शहरातील नेहरूनगर परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सोलापूर येथील शेख कुटुंबाविरूद्ध नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी की, शिरिषमल अजहर शेख (ह. मु. नांदगाव हिचे 10 ऑगस्ट 2014 रोजी दर्गा गल्ली, सांगली येथील रहिवासी अजहर अस्लम शेख याच्याशी विवाह झाला. तेव्हापासून त्यांच्या कुटुंबातील अजू शेख, आरीफा शेख, शकील शेख यांच्याकडून विवाहितेस मारहाण करणे, उपाशीपोटी ठेवणे, शिवीगाळ करणे हे प्रकार सुरूच होते. तसेच विवाहितेच्या पतीचे दुसर्‍या महिलेशी प्रेमसंबंध असल्याने तिच्याशी लग्‍न करण्यासाठी संमती मिळावी म्हणून वारंवार पत्नीचा छळ करीत असे.

त्यामुळे सदर महिला नांदगावी माहेरी आली होती. याचदरम्यान शनिवारी (दि.5) पती व सासरच्या मंडळींनी माहेरी येऊन जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून नांदगावहून येवला रोडच्या दिशेने घेऊन जात होते. पाच किलोमीटर अंतर पार केल्यानंतर संगनमत  करुन सदर विवाहितेला बळजबरीने विषारी औषध पाजण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने कशीबशी सुटका करून माहेर गाठले.माहेरच्यांनी तिला नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी सांगली येथील रहिवाशी असलेल्या शेख कुटुंबातील चार जणांवर छळाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक बशीर शेख तपास करीत आहे. घटनेतील संशयित फरार आहेत.