Tue, Nov 13, 2018 05:59होमपेज › Nashik › जामिनावर सुटताच तिघांवर हल्ला 

जामिनावर सुटताच तिघांवर हल्ला 

Published On: Dec 18 2017 2:39AM | Last Updated: Dec 17 2017 11:28PM

बुकमार्क करा

पंचवटी : वार्ताहर

खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जामिनावर बाहेर आलेल्या तुकाराम दत्तू चोथवे याने रविवारी (दि.17) क्रांतीनगर येथील ड्रिमकॅसल परिसरात धारदार शस्त्राने तीन युवकांवर प्राणघातक हल्ला केला. जखमींवर खासगी तसेच जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परिसरात दहशत पसरवण्यासाठी चोथवेने हा हल्ला केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

समीर हांडे याच्या खून प्रकरणात तुकारामसह त्याच्या साथीदाराला जानेवारीमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर तुकारामने उच्च न्यायालयात धाव घेत जामीन मिळवला. दरम्यान, ज्वाल्या खून प्रकरणातील दुसर्‍या संशयितावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तुकारामविरोधात गुन्हा दाखल करून त्यास कारागृहात पाठवण्यात आले. त्या गुन्ह्यातही तुकारामला काही दिवसांपूर्वीच जामीन मिळाला होता.

त्यानंतर त्याने परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी क्रांतीनगर परिसरात सायंकाळी पाच ते सहाच्या सुमारास  शस्त्राने युवकांवर वार केले. या हल्ल्यात रोशन अशोक कटारे (26, रा. राधानगर, मखमलाबाद), विनोद रामदास ठाकरे (25,रा. पेठरोड) आणि केदार साहेबराव इंगळे (रा. हनुमानवाडी) हे तिघे युवक जखमी झाले आहेत.