Fri, Jul 19, 2019 20:28होमपेज › Nashik › ओझरखेड धरणात बुडून इंजिनिअरचा दुदैवी मृत्यू

ओझरखेड धरणात बुडून इंजिनिअरचा दुदैवी मृत्यू

Published On: Mar 11 2018 5:06PM | Last Updated: Mar 11 2018 5:06PMवणी  वार्ताहर 

रविवार दि.11रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ओझरखेड धरणात आंघोळीसाठी गेलेल्या इंजिनिअरचा पाण्यात बुडुन दुदैवी अंत झाला. त्याचे नांव मोहम्मद सरवर मोहम्मद मोबीन (वय 25) असे असून, तो मुळचा जमशेदपुर झारखंड येथिल आहे, तो महिंद्रा कंपनीत इंजिनिअर म्‍हाणून काम करत होता.

याविषयी अधिक माहिती अशी की, मोहम्मद.सरवर व त्याचे चार मित्र व मावसभाऊ रविवार सुटटी असल्याने वणी परिसरात फिरण्यासाठी आले होते ते ओझरखेड धरणावर थांबले होते. त्यांना येथे आंघोळ करण्याचा मोह आवरला नाही. ते आंघोळीसाठी पाण्यात ओझरखेड गावाच्या बाजुने उतरले होते.त्यातील सरवरचा पाय चिखलात घसरल्याने तो पाण्यात ओढला गेला. त्यातच या जलाशयाखाली अधिक चिकट माती असल्याने तो खोल पाण्यात ओढला गेला त्‍यातच पाण्यात बुडू लागला. त्या समवेत असलेल्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु खोल पाण्यात गेल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याच्या सोबत असलेलेल्यांनी आराडा ओरड केल्याने आजु बाजूचे लोक गोळा झाले. येथील नागरिकांनीही त्‍याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तो खोल पाण्यात बुडाला. ओझरखेड सरपंच गंगाधर निखाडे यांनी या बाबत वणी पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. तसेच 108 रूग्ण्वाहिकेस फोन केला. वणी पोलीस ठाण्याचे हवालदार पारखे व जाधव हे घटना स्थळी दाखल झाले त्‍यांनी लोकांच्या मदतीने त्याला बाहेर काढले. या ठिकाणी आलेले रूग्णवाहिकेचे डॉ.प्रकाश देशमुख यांनी तपासले असता मोहम्मद सरवर मोहम्मद मोबीन याचा मृत्यू झाला होता. वणी ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. वणी पोलीस या घटनेची चैकशी करीत आहेत. या घटनेविषयी वणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद  करण्यात आली आहे 

मोहम्मद  सरवर हा जमशेदपुर झारखंड येथिल असुन, महिंद्रा कंपनीत तो इंजिनिअर होता. त्याच्या बरोबर असलेले त्याचे मित्र व मावस भाऊ त्याच्या सोबत होते सुटटी असल्याने ते या परिसरात फिरण्यासाठी आले होते त्यात हा दुदैवी प्रकार झाडला ही महिती त्यांच्या कंपनीत कळताच कंपनीचे कर्मचार व अधिकारी वणी येथे दाखल झाले. तसेच त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या घरी जमशेदपुरला कळविण्यात आली आहे. शवविच्छेदन करून मृतदेह जमशेदपुर झारखंड येथे नेण्यात येणार आहे