Mon, Mar 25, 2019 17:26होमपेज › Nashik › मतदार नोंदणी अधिकार्‍यांच्या हाती येणार संगणक

मतदार नोंदणी अधिकार्‍यांच्या हाती येणार संगणक

Published On: Dec 09 2017 1:44AM | Last Updated: Dec 09 2017 1:16AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

मतदार नोंदणी तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकार्‍यांच्या हाती लवकरच संगणक, स्कॅनर आणि प्रिंटर मिळणार आहे. मतदारयाद्या अद्ययावतीकरण तसेच ऑनलाइन नोंदणीचे काम अधिक गतिमान व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी 22 लाखांचा निधी मिळाला आहे.

निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकांच्या अगोदर जास्तीत जास्त नवमतदार नोंदणी उप्रकम हाती घेतला आहे. तसेच, मतदार याद्यांमधील दुबार मतदार, मयत व्यक्तींचे नावे वगळणे तसेच, मतदारांच्या नावात बदल करणे आदी कामे हाती घेतले आहे.  नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी जास्तीत जास्त ऑनलाइन प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून यापुढे आता मतदान नोंदणी तसेच सहायक अधिकार्‍यांना संगणक, प्रिंटर व स्कॅनर देण्यात येणार आहे. 

मतदारांनी नावनोंदणीचा भरून दिलेला अर्ज व त्यासोबतची कागदपत्रे तसेच छायाचित्र तत्काळ स्कॅन करून ती आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड केली जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी वारंवार शासकीय कार्यालये गाठण्याची गरज पडणार नाही.

जिल्ह्यात एकूण 15 विधानसभा मतदारसंघ असून, प्रत्येक मतदारसंघातील दोन अधिकारी याप्रमाणे 30 संगणक, स्कॅनर व प्रिंटर दिली जाणार आहेत. त्यासाठी आयोगाने 22 लाखांचा निधी मंजूर केला आहे. सरकारी कामकाजासाठी लागणार्‍या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी शासनाने गर्व्हन्मेंट इलेक्ट्रॉनिक मार्केट या संकेतस्थळावर पुरवठादारांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीतील कंपन्यांकडूनच या वस्तू खरेदी करायचे बंधन जिल्हा निवडणूक शाखेवर असले. एकूणच संगणकामुळे निवडणूक शाखेच्या ऑनलाइन कामकाजात यापुढे गतिमानता येणार आहे.