Sun, Jul 21, 2019 16:46
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › खातरजमा करूनच सोशल मीडियाचे मेसेज फॉरवर्ड करा

खातरजमा करूनच सोशल मीडियाचे मेसेज फॉरवर्ड करा

Published On: Jul 06 2018 1:33AM | Last Updated: Jul 05 2018 11:32PMनाशिक : प्रतिनिधी

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक यासह सोशल मीडियातील माध्यमांमधून फिरणार्‍या माहितीविषयी  खातरजमा करण्याबरोबरच संबंधित व्यक्‍ती वा ग्रुप कोणता आहे, याची माहिती घेतल्याशिवाय ती फॉरवर्ड करू नये, असा सल्ला सायबर तज्ज्ञ तन्मय दीक्षित यांनी दिला आहे. शिवाय सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी तसेच सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना करता येऊ शकेल, याविषयी विविध टिप्सही त्यांनी दिल्या.

सोशल मीडियावरील अफवांचे पीक मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. सोलापूर जिल्ह्यातील राईनपाडा आणि मालेगाव येथे मुले पळविणारी टोळी आल्याच्या अफवेने तर सर्वांनाच सुन्‍न केले. यासंदर्भात पोलीस प्रशासन आणि सायबर क्राइमही सतर्क झाले असले तरी अशा अफवा पसरविल्या जाणार नाहीत आणि त्याला आपण बळी पडणार नाही याची काळजी सोशल मीडियाचा वापर करणार्‍या प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. अन्यथा अफवांमुळे घडणार्‍या दंगली, मारहाणीसारख्या घटना कोणीही रोखू शकत नाही. सायबर क्राइम घडत असेल तर त्याविषयी सायबर क्राइम विभागाशी संपर्क साधावा. सायबर क्राइमपासून कसे सुरक्षित राहता येईल यासाठी यू ट्यूबवर सायबर फंडा नावाने जनजागृतीचे काम हाती घेण्यात आल्याचे दीक्षित यांनी सांगितले.काय काळजी घ्याल?  सोशल मीडियाद्वारे वेगवेगळे ग्रुप आणि व्यक्‍ती आपल्याला त्यांच्याशी जोडण्याचे वा सामील होण्यास सांगत असतात. अशावेळी संबंधित ग्रुप वा व्यक्‍ती आपल्या चांगल्या परिचयाची आहे का याची पडताळणी करणे आवश्यक आहे.

अन्यथा अशी व्यक्‍ती गुन्हेगारी प्रवृत्तीची असू शकते. ग्रुपमध्ये सामील होताना वा एखाद्या व्यक्‍तीबरोबर जोडले जाताना संबंधित मोबाइल क्रमांक ‘प्लस91’ ने सुरुवात होणारा असेल तर ते सिम भारतीय आहे आणि क्रमांकाची सुरुवात प्लस 92 वा अन्य क्रमांकाने होणारी असेल तर परदेशातील क्रमांक आहे असे समजावे.  व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये कोण कोण व्यक्‍ती आहे याबाबतची खातरजमा अ‍ॅडमिनने करावी. त्याचबरोबर अ‍ॅडमिनची ग्रुपमधील प्रत्येक व्यक्‍तीशी वैयक्‍तिक ओळख असली पाहिजे आणि अशाच व्यक्‍ती ग्रुपमध्ये असाव्यात. संगणकाच्या आधारे तयार करण्यात येणार्‍या व्हर्च्युअल नंबरपासून सावध राहावे.

अशा क्रमांकाच्या आधारे संबंधित मोबाइलधारकाची संपूर्ण माहिती हॅक करू शकतो. प कुणालाही ट्रोल करण्याआधी संबंधित व्यक्‍तीशी संपर्क साधून घटना वा प्रसंग खरा की खोटा याची पडताळणी करावी. सध्या याबाबतचे फॅड वाढताना दिसत असून, ते अंगलट येण्याची शक्यताच अधिक असते. प फोटोशॉप व त्यासारखे अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत. यामुळे एखादे छायाचित्र एडिट केले जाऊ शकते. त्यातून अनेकदा गैरसमज निर्माण होऊन अफवा पसरवली जाते. त्यापासूनही सावध राहावे.