Tue, Mar 19, 2019 09:20होमपेज › Nashik › नाशिक्‍लबमध्ये अवतरला फुलांचा स्वर्ग!

नाशिक्‍लबमध्ये अवतरला फुलांचा स्वर्ग!

Published On: Jan 26 2018 1:17AM | Last Updated: Jan 25 2018 11:20PMनाशिक : प्रतिनिधी 

नाशिक-पुणे महामार्गावरील नाशिक्लब येथे विविधरंगी फुलांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यात पुष्पप्रेमींसाठी ठेवण्यात आलेल्या 20 हजार फुलांच्या कुंड्या पाहून जणू फुलांचा स्वर्गच अवतरल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. नाशिकची पूर्वीची गुलशनाबाद ही ओळख जपण्याचा प्रयत्न नाशिक्लबने या प्रदर्शनाच्या माध्यमातून केला आहे. 

नाशिकमधील 16 शाळांच्या सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांनी गुरुवारी (दि. 25) हजेरी लावत या पुष्पोत्सवाचा आनंद लुटला. अगदी ज्येेष्ठ नागरिकांनीही या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. 

प्रदर्शनातील फुलांची मांडणी, हँगिंग बास्केट, गवताच्या झोपड्यांची विशिष्ट्यपूर्ण मांडणी बघून लहान बालके, तरुण मंडळी यांच्यासोबत ज्येेष्ठमंडळींनाही सेल्फीचा मोह आवरला नाही. गर्द लाल रंगाच्या गुलाब पुष्पातील ‘नाशिक्लब’ हे नाव तसेच हिरव्या दाट गवतापासून बनवलेला सोपा हा बघ्यांचा सेल्फी पॉइंट ठरत आहे. या प्रदर्शनातील फुले तर छान आहेच परंतु त्याच बरोबर त्यांची केलेली सुबक मांडणीदेखील सुखद स्पर्श करून जाते. महत्वाची बाब म्हणजे या प्रदर्शनात ठेवण्यात आलेली ही फुले बाहेरून न आणता  येेथेच वाढवली जातात. 28 जानेवारीपर्यंत पुष्पप्रेमींना या प्रदर्शनाचा आस्वाद घेता येणार आहे. 

फुलांच्या 20 हजार कुंड्या

प्रदर्शनात यंदा 20 हजार फुलांच्या कुंड्या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. यात ऍडीनीमच्या एकशे सात प्रजाती, चाळीस प्रकारच्या  हंगामी प्रजाती, वर्षभर फुलणारी चाळीस तर एकशे दहा प्रकारच्या गुलाब पुष्पांच्या प्रजातींचा समावेश  आहेत. शेवंतीच्या एकवीस प्रजाती एकाच ठिकाणी पाहण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिली आहे.