Wed, Jun 26, 2019 11:31होमपेज › Nashik › मानवतेचा संदेश देणारी वानराची अत्यंरात्रा

मानवतेचा संदेश देणारी वानराची अत्यंरात्रा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : कळवण प्रतिनिधी

कळवण तालुक्यातील पाळे खुर्द व बुद्रुक येथे गेल्या तीन वर्षापासून वास्तव्यास असलेल्या वानराचा वृद्धपकाळाने निधन झाल्याने समस्त गावकरी दु:खी झाले. या वानराला सजवून त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. ग्रामस्थांनी आपले प्रेम व्यक्त करत या मुक्या जीवाला मुक्ती दिली. 

पाळे परिसरात तीन वर्षाआधी एक वानर भटकत आले हाते आणि ते याच ठिकाणी स्थायीक झाले. पण येथील ग्रामस्‍थांना त्याने कधीच त्रास दिला नसल्याने सर्वानाच याचा लळा लागला होता. विशेष म्हणजे लहान बालकांमध्येही हे वानर प्रिय झाले होते.

वृद्धपकाळाने काही दिवसापासून हे वानर आजारी पडले होते. आजारपण आणि वाढता उष्माघात यामुळे वानराचा आकाली मृत्यू झाला. मात्र वानराच्या या प्रेमापोटी ग्रामस्थांनी वानराचे हिंदू धर्म संस्कृती प्रमाणे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार वानराला सजवून अंत्ययात्रा काढून अंत्यविधी करून मानवताचा अनोखा संदेश दिला.

 


  •