Fri, Jul 19, 2019 18:13होमपेज › Nashik › केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरेंना पितृशोक

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरेंना पितृशोक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

धुळे : पुढारी ऑनलाईन

लोकनेते दादासाहेब रामराव सिताराम भामरे (पाटील) यांचे शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.  आज सायंकाळी पाच वाजता मालपुर ता. साक्री येथे त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे तसेच भाजपाचे प्रांतिक सदस्य श्री. सुरेश भामरे (पाटील) यांचे ते वडील होते. दादासाहेब रामराव सिताराम पाटील यांनी साक्री तालुक्यासह जिल्हाभरात सहकार क्षेत्र, शैक्षणिक संस्था, साखर कारखाना, बँक आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला होता. 


  •