Tue, Jun 18, 2019 22:40होमपेज › Nashik › युतीबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेऊ : दानवे

युतीबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेऊ : दानवे

Published On: Mar 18 2018 1:31AM | Last Updated: Mar 18 2018 1:29AMनाशिक : प्रतिनिधी

शिवसेना आज तरी आमच्या सोबत आहे. यापुढे परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. राहता राहिला प्रश्‍न शरद पवार आणि राज ठाकरे भेटीचा तर त्याबाबत कोणाला कोणाची गरज आहे ज्याने त्याने ठरवावे, असा टोला हाणत या भेटीला आम्ही महत्त्व देत नाही, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाशिक येथील मेळाव्याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाजपा-शिवसेना युतीबाबत भाजपाच्या भूमिकेबाबत त्यांना विचारले असता शिवसेनेला बरोबर घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे.

यामुळे सध्या तरी शिवसेना आमच्यासोबत आहे. सेनेने सोबत राहावे, ही आमची भूमिका आहे. परंतु, पुढील निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक राज्यात भाजपाचे मित्र पक्ष आपला अजेंडा राबवित आहेत. भाजपाने शेतकर्‍यांचा नेहमीच सहानुभूतीपूर्वक विचार केलेला आहे. आजही शेतकरी शासनाच्या पाठीशी भक्‍कमपणे उभा आहे. शनिवारी (दि.17) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि  मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीविषयी त्यांना विचारले असता कुणाला कुणाची गरज आहे हे ज्याने त्याने ठरवावे. त्यामुळे तो आमचा विषय नाही आणि त्याला आम्ही महत्त्वही देत नाही, असे त्यांनी सांगत अधिक भाष्य करण्याचे टाळले.

 

Tags : nashik, nashik news, shivsena, BJP, Raosaheb Danve, Alliance circumstances,