Sat, Mar 23, 2019 16:53होमपेज › Nashik › उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनी भगवा सप्‍ताह

उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनी भगवा सप्‍ताह

Published On: Jul 22 2018 1:00AM | Last Updated: Jul 21 2018 11:21PMनाशिक : प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 27 जुलै रोजी होणार्‍या जन्मदिनाचे औचित्य साधून शिवसेना नाशिक महानगरातर्फे शहरात दि. 22 ते 28 जुलै या कालावधीत भगव्या सप्‍ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 

22 जुलै रोजी सकाळी 11 वाजता अनाथ आश्रमात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले जाईल. मध्य नाशिक शाखाप्रमुख राकेश साळुंखे यांनी अभीष्टचिंतन सोहळा आयोजित केला आहे. तर दुपारी 12 वाजता आरटीओ कार्यालय येथे विविध कार्यक्रम विभागप्रमुख हरिभाऊ काळे यांनी आयोजित केले आहेत. सायंकाळी 7 वाजता विभागाप्रमुख संतोष पेलमहाले यांच्यातर्फे काळाराम मंदिर येथे महाआरती व प्रसाद वाटप होईल. याच पद्धतीने 23 ते 28 जुलै या काळात शहरातील सातपूर, सिडको, नाशिकरोड, पंचवटी, पूर्व अशा विविध विभागांत विविध सामाजिक तसेच सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमांना शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, राज्यमंत्री दादा भुसे, उपनेते बबन घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र संघटक सत्यभामा गाडेकर, रंजना नेवाळकर, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, आमदार योगेश घोलप, दत्ता गायकवाड, जयंत दिंडे, अजय बोरस्ते, विलास शिंदे, विनायक पांडे, सुधाकर बडगुजर, दीपक दातीर आदी उपस्थित राहणार आहेत.