Wed, Jun 26, 2019 11:25होमपेज › Nashik › सिन्‍नरचे दोन पोलीस निलंबित

सिन्‍नरचे दोन पोलीस निलंबित

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 26 2018 11:33PMसिन्‍नर : प्रतिनिधी

सिन्‍नर पोलीस ठाण्याच्या कोठडीत असलेल्या संशयित आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्या प्रकरणात दोन पोलीस हवालदारांचे निलंबन करण्यात आले आहेत. नाशिक ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी ही कारवाई केली आहे.

पोलीस हवालदार नितीन मंडलिक व बी. के. झनकर अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांची नावे आहेत. शनिवारी  (दि. 25) दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास सोन्या उर्फ डीचक दौलत जाधव (19) या संशयिताने पोलीस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या दरम्यान पोलीस हवालदार मंडलिक व झनकर हे ड्यूटीवर होते. त्यांनी कामात हलगर्जीपणा केल्यानेच ही घटना घडल्याचा ठपका पोलीस अधीक्षक कार्यालयाने ठेवला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक दराडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही या कारवाईला दुजोरा दिला आहे.

दरम्यान, शनिवारी (दि. ) धुळे येथे शवविच्छेदन केल्यानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कारासाठी जाधव याचा मृतदेह सिन्‍नरला आणण्यात आला. वातावरण तणावपूर्ण असल्याच्या पार्श्‍वभूमीवर जोशीवाडीसह पोलीस ठाण्याच्या आवारात बंदोबस्त ठेवला होता.