Mon, Sep 24, 2018 04:17होमपेज › Nashik › टँकरच्या धडकेत इगतपुरीजवळ दोन ठार

टँकरच्या धडकेत इगतपुरीजवळ दोन ठार

Published On: Aug 21 2018 1:38AM | Last Updated: Aug 20 2018 10:44PMइगतपुरी : वार्ताहर

कसारा घाटातील लतिफ वाडीजवळील बाबा का ढाबा येेथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या होंडा सिटी कार व पिकअपला मागून येणार्‍या ऑइल टँकरने जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात दोन जण जागीच ठार, तर दोन जखमी झाले आहेत.

जुन्या कसारा घाटातील लतिफ वाडीजवळील बाबा का ढाबा येथे सकाळी पिकअप (एमएच 48, 1773)  व त्यामागे होंडा सिटी कार (एमएच 02,  9119) उभी होती. यावेळी मुंबईहून नाशिककडे भरधाव येणार्‍या ऑइल टँकरने उभ्या असलेल्या होंडा सिटी कारला मागून जोरदार धडक दिली. या कारमधील सुशीला सुब्रह्मण्यम (65) व पतीयल (61) रा. तिरुवनंतपुरम (केरळ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुधा मुर्गण (60) व निवृत्ती सुपेकर (45) दोन जण जखमी झाले. तर पिकअपचे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती कळताच पीक इन्फ्राचे कर्मचारी विजय कुंडगर, शिवा कातोरे, अनिल ठाकूर, सुरेश जाधव, संदीप म्हसणे, समीर चौधरी, उमेर शेख यांनी घटनास्थळी जाऊन मदत केली. जखमींना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.