Sat, Nov 17, 2018 21:27होमपेज › Nashik › मंगरूळ शिवारात गाडीच्या अपघातात तरुणी ठार, दोन जण गभीर 

मंगरूळ शिवारात गाडीच्या अपघातात तरुणी ठार, दोन जण गभीर 

Published On: Jun 13 2018 12:08AM | Last Updated: Jun 13 2018 12:07AMचांदवड (नाशिक) :- चांदवड तालुक्यातील मंगरूळ गावच्या शिवारातील हॉटेल आदर्श समोरील मुंबई आग्रा महामार्गावर नाशिककडून चांदवड कडे येणारी सिल्व्हर रंगाची स्विफ्ट डिझायर (एम एच ४, इ टी ८८६५) चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या म्हसोबा मंदिरात गाडी घातली. गाडी वेगात असल्याने गाडीचा पुर्णतः चेंदामेंदा झाला आहे. 

या अपघातात हैमांगी राजेंद्र दैसाने (बी फार्मसी कॉलेजची विद्यार्थीनि नगाव, धुळे) हीचा जागीच मृत्यू झाला. तर प्रथमेश प्रेमचंद डोणकर व हर्षल संजय खैरनार (वय २१, नैना सोसायटी, देवपूर,धुळे) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी नाशिकला हलविले आहे. या घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेचे डॉ भालचंद्र पवार, डॉ सतीश गांगुर्डे यांनी घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार केले. यावेळी पोलीस निरीक्षक अनंत मोहिते व पोलीस कर्मचारी तपास करीत होते. अपघातातील सर्व जण हे धुळे येथील रहिवाशी असून ते त्र्यंबकेश्वर येथे फिरायला गेले असल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.