Mon, May 20, 2019 18:35होमपेज › Nashik › राजीवनगरला दोन झोपड्यांना आग

राजीवनगरला दोन झोपड्यांना आग

Published On: Jul 18 2018 1:54AM | Last Updated: Jul 17 2018 11:50PMइंदिरानगर : वार्ताहर 

राजीवनगर येथील शंभरफुटी रस्त्यालगत असलेल्या झोपडपट्टीतील विद्युत रोहित्राजवळ बांधलेल्या झोपडीला सकाळी साडेआठच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत दोन झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. यात संसारोपयोगी साहित्यासह वापराचे कपडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सिडको अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. राजीवनगर झोपडपट्टीकडे जाणार्‍या रस्त्यालगत महावितरणच्या रोहित्राजवळ अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या झोपडीत सकाळी साडेआठच्या सुमारास  पावसामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागली.

या आगीने लगत असलेल्या दुसर्‍या झोपडीला कवेत घेतले. आग लागल्याचे कळताच प्रभाग 30 चे नगरसेवक सतीश सोनवणे यांनी घटनास्थळी येऊन तातडीने अग्निशामक दलास फोन करून पाचारण केले. अग्निशामक दलाच्या एका बंबाने आग आटोक्यात आणली. परंतु, त्यामध्ये राही बंडू सावंत यांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. तसेच बाळू गायकवाड यांच्या घरातील महत्त्वाची कागदपत्रे टीव्ही जळून खाक झाले. प्रभागाचे नगरसेवक  सोनवणे यांनी तातडीने सावंत यांना रोख पाच हजार आणि गायकवाड यांना रोख दीड हजाराची आर्थिक मदत केली. घटनास्थळी गणेश चौक येथील विद्युत अभियंता संतोष धारराव व कर्मचार्‍यांनी धाव घेऊन पाहणी केली.