Tue, Nov 20, 2018 17:24होमपेज › Nashik › दोन दिवसांनंतर सूर्यदर्शन

दोन दिवसांनंतर सूर्यदर्शन

Published On: Dec 07 2017 1:32AM | Last Updated: Dec 06 2017 11:36PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

ओखी चक्रीवादळामुळे जिल्ह्यात निर्माण झालेली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून, दोेन दिवसांनंतर बुधवारी (दि. 6) नाशिककरांना सूर्यदर्शन झाले. 

चेन्नई, तामिळनाडूत धुमाकूळ घातलेल्या ओखी वादळाने मंगळवारी गुजरातच्या किनारपट्टीवर धडक दिली. या वादळाचा परिणाम म्हणजे दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दोन्ही दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासांत 171.3 मिमी पावसाची नोंद जिल्ह्यात करण्यात आली. दरम्यान, वातावरणात झालेल्या बदलामुळे दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या पार्‍यातही लक्षणीय वाढ झाली आहे. बुधवारी जिल्ह्यात 17.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली.