Thu, Jul 18, 2019 17:22होमपेज › Nashik › नाशिक : देशी कट्टा घेऊन फिरणाऱ्या तरुणांना अटक

नाशिक : देशी कट्टा घेऊन फिरणाऱ्या तरुणांना अटक

Published On: Dec 18 2017 2:43PM | Last Updated: Dec 18 2017 2:43PM

बुकमार्क करा

सिडको : वार्ताहर

अशोक नगर सातपूर परिसरात पोलिसांनी सापळा रचून तरुणांकडून एक गावठी कट्टा हस्तगत केला. तरुणांवर सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातपूर परिसरात एका तरुणाकडे देशी बनावटीचा कट्टा असून तरुण कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखा २ च्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती. काही अनुचित प्रकार घडण्याआधीच सातपूर पोलिसांनी त्याला अटक केली. 

गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक १७ रोजी सातपूर परिसरातील अशोक नगर येथे संशयित आरोपी पांडुरंग मुरलीधर लगड(२० भैरव नगर,काकड मळा)  व एक अन्यायग्रस्त बालकास देशी बनावट कट्ट्यासह ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर विनापरवाना बंदूक वापरल्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा कट्टा कोणत्या कामासाठी आणण्यात आला होता,तर कोठून आणण्यात आला आहे याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत. सदरची कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश माईणकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे,पोलीस उपनिरीक्षक रवींद्र सहारे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव,राजाराम वाघ, परमेश्वर दराडे, योगेश सानप, बाळा नांद्रे यांसह कर्मचाऱ्यांनी केली आहे.