Fri, Jul 19, 2019 07:05होमपेज › Nashik › उड्डाणपुलावर उभ्या ट्रकला धडकून दोन युवक ठार 

उड्डाणपुलावर उभ्या ट्रकला धडकून दोन युवक ठार 

Published On: Jan 29 2018 1:31AM | Last Updated: Jan 28 2018 10:48PMनाशिक : प्रतिनिधी

मुंबई-आग्रा महामार्गावरील औरंगाबाद नाका परिसरातील उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या ट्रकवर आदळून  दोघे दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाले. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. आकाश रामदास काखे (25, रा. कॅनडा कॉर्नर) व त्याचा मित्र रोशन जगन्नाथ ओझरकर (रा. आकाश पेट्रोलपंपाजवळ, दिंडोरी रोड) अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. 

द्वारकाकडून आडगावच्या दिशेने (एमएच 15 डीएक्स 8472) क्रमांकाच्या दुचाकीवरून उड्डाणपुलावरून जात होते. औरंगाबाद नाका परिसरातील उड्डाणपूल पोल क्रमांक 21 च्या दरम्यान सीजी 04 जेसी 7514 क्रमांकाचा मालवाहतूक ट्रकमध्येतांत्रिक कारणामुळे बिघाड झाल्याने तो उड्डाणपुलावर उभा  होता. भरधाव असल्याने आकाश आणि रोशन यांच्याकडील दुचाकी ट्रकवर जाऊन आदळली.