Tue, Jul 23, 2019 16:42होमपेज › Nashik › नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर तिहेरी अपघात

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर तिहेरी अपघात

Published On: Jun 05 2018 3:38PM | Last Updated: Jun 05 2018 3:38PMमुकणे (नाशिक) : वार्ताहर 

मुंबई-आग्रा महामार्गावर मुंढेगाव जवळ आज (मंगळवारी) सकाळी तिहेरी अपघात झाला. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून त्याना उपचारार्थ नाशिकला हलविण्यात आले आहे. दरम्यान अपघातग्रस्त  ट्रकने अचानक पेट घेतल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घोटी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वृत्त असे की, मुंबई नाशिक महामार्गावर मुंढेगाव शिवारात आज सकाळी घोटीहून नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशी वाहनाला ट्रक क्रमांक एमएच 04 एच वाय 7474 ने धडक दिली. याचवेळी पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकने या अपघातग्रस्त वाहनाला धडक दिली. यातील एका ट्रकने अचानक पेट घेतला.

या अपघातानानंतर एक वाहन वाहनचालकाने फरार केले. या वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत. या अपघातात प्रवाशी वाहनातील पांडूरंग गंगाराम चिते वय.35 रा.हरसूल(देवळा) रामदास गंगाराम चिते (वय 40) लिलाबाई रामदास चिते (वय 30) आणि कार्तिक राजाराम आंबेकर  (वय 15) सर्व रा.मुकणे जखमी झाले आहेत. त्यांना नरेंद्रनाथ संस्थानच्या रुग्णवाहिकेतून चालक निवृत्ती गुंड यांनी तात्काळ नाशिक येथे उपचारार्थ हलविण्यात आले.

अपघाताची माहिती समजताच घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्यासह हवालदार सुहास गोसावी,आदींनी घटनास्थळी धाव घेऊन सुरक्षितेच्या दृष्टीने वाहने एका बाजूने वळविली. टोल प्लाझा व इगतपुरी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाच्या सहाय्याने ट्रकची आग विझविण्यात आली. त्यानंतर वाहतूक पूर्वरत करण्यात आली.