Tue, Nov 20, 2018 21:04होमपेज › Nashik › त्र्यंबकचा बाळू बोडके ‘महाराष्ट्र केसरी’

त्र्यंबकचा बाळू बोडके ‘महाराष्ट्र केसरी’

Published On: Dec 22 2017 1:28AM | Last Updated: Dec 21 2017 11:35PM

बुकमार्क करा

त्र्यंबकेश्‍वर : वार्ताहर 

पुणे येथे झालेल्या राज्य कुस्तीगीर परिषदेच्या 61 व्या अधिवेशनातील कुस्ती स्पर्धेत त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील वेळुंजे येथील बाळू दौलत बोडके याने 74 किलो वजनी गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याने सोलापूरच्या पहिलवानाला 0-10 च्या फरकाने धूळ चारली. बाळू बोडकेच्या या यशाने तब्बल 32 वर्षांनंतर त्र्यंबक तालुक्याला महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळाला आहे. बाळूच्या यशाची बातमी कळताच गावात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. लहानपणापासूनच बाळू कुस्तीचे धडे गिरवत होता.