Fri, Apr 26, 2019 17:20होमपेज › Nashik › नगराध्यक्षपदाचे १७, तर नगरसेवकाचे ३१ अर्ज माघार

नगराध्यक्षपदाचे १७, तर नगरसेवकाचे ३१ अर्ज माघार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

त्र्यंबकेश्‍वर : वार्ताहर 

कुरघोडीच्या राजकारणाची खासियत असलेल्या त्र्यंबकेश्‍वर शहरात यावेळच्या नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या दृष्टीने 18 दिवसांपासून वातावरण तापलेले असताना, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी दोन, तर शिवसेनेच्या एका अधिकृत उमेदवाराने नगरसेवकपदाचे, तर आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर प्रभाग 3 मधून भाजपाच्या त्रिवेणी तुंगार या बिनविरोध निवडून आल्याने त्र्यंबकेश्‍वरमध्ये निवडणुकीआधीच खाते उघडणार्‍या भाजपाच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.

मंगळवारी (दि. 28) नगराध्यक्ष पदासाठीच्या रिंगणातून 17, तर नगरसेवक पदासाठीच्या 31 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. अद्याप नगराध्यक्ष पदासाठी सात, तर नगरसेवक पदासाठी विविध प्रभागांतील एकूण 55 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत.

नगराध्यक्षपदाच्या महत्त्वपूर्ण मुकाबल्यासह काँग्रेस-भाजपात मुख्य लढत होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी पुरुषोत्तम कडलग यांनी अर्ज मागे घेतला. काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात झालेल्या आघाडीत नगराध्यक्षपदाची उमेदवारी काँग्रेसच्या वाट्याला गेली.  तर भाजपाचे वकील आघाडीचे पराग दीक्षित यांनी अपक्ष उमेदवारी ठेवल्याने भाजपाची डोकेदुखी वाढली आहे.