Wed, Feb 20, 2019 19:44होमपेज › Nashik › त्र्यंबकचे डॉ. बिंदू महाराज मेंदूतील रक्तस्त्रावाने रूग्णालयात

त्र्यंबकचे डॉ. बिंदू महाराज मेंदूतील रक्तस्त्रावाने रूग्णालयात

Published On: Feb 26 2018 5:28PM | Last Updated: Feb 26 2018 5:30PMत्र्यंबकेश्वर : वार्ताहर

श्री पंचायती बडा उदासिन आखाड्याचे महंत आणि पेगलवाडीच्या महाकाली मंदिर व बिंदू आश्रमाचे प्रमुख डॉ. बिंदू महाराज यांना मेंदूतील रक्तस्त्रावामुळे नाशिकच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

येथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असून, वेळ पडल्यास त्यांना पुढील उपचारासाठी दिल्ली येथे हलविण्याची तयारी त्यांच्या शिष्यगणांनी केल्याचे समजते. काल रविवारी पेगलवाडी येथील बिंदू आश्रमात पडल्याने त्यांच्या डोक्यास इजा होऊन रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्यांना तातडीने नाशिकला उपचारासाठी हलविण्यात आले.

दरम्यान त्यांच्या औषधोपचारांवर पालकमंत्री गिरीश महाजन लक्ष ठेवून असल्याचे समजते. पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांची रुग्णालयात भेट घेतल्याचे समजते. त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक कार्यासोबत सामाजिक कार्यात ते नेहमीच पुढे असतात. त्र्यंबकेश्वर मंदिरात पार्वतीमातेची मूर्ती बदलण्यासाठी त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. तसेच गोरक्षेसाठी मजबूत फळी उभारून त्र्यंबकेश्वर येथून कत्‍तलखाण्यात जाणाऱ्या शेकडो गायींना त्‍यांनी जीवनदान दिले आहे.