Tue, Jun 25, 2019 14:04होमपेज › Nashik › त्र्यंबकेश्वर नाशिक मार्गावर दोन वाहनांची धडक ; दोन्ही चालक ठार

त्र्यंबकेश्वर नाशिक मार्गावर दोन वाहनांची धडक ; दोन्ही चालक ठार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

त्र्यंबकेश्वर : वार्ताहर 

नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर आज सकाळी कार आणि छोटा हत्ती या दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही चालक जागीच ठार झाले. नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर आज सकाळच्या दरम्यान हा अपघात झाला. नाशिककडून मोखाड्याला जात असलेली कार आणि छोटा हत्ती रिकामे कॅरेट घेऊन नाशिकडे जात असताना खंबाळे शिवारात वाहन तळा जवळ यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात चार व्यक्ती जखमी तर दोन्ही चालक जागीच ठार झाले. या अपघाताची नोंद त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार जखमी व्यक्तींना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठार झालेल्या व्यक्तींची नावे कारचा चालक  सुरेश धोंडु ठोंबरे वय (३९) आणि छोटा हत्ती चालकाचे नाव अद्यपही समजले नाही. तर अन्य चार जखमींची नावे शामराव पुंडलिक नवसात वय (४५), सुवर्णा सुरेश देवरे वय (४५), किरण सोमनाथ देवरे वय (३४),दिलीप शामराव शिंपी वय ५१ ही चौघेही कामथवाडी येथील असल्याचे समजले आहे. 

Tags : Trimbakeshwar,   Nashik, accident 


  •