Wed, Mar 20, 2019 08:48होमपेज › Nashik › 'राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा-शिवसेना युती गरजेची'

'राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा-शिवसेना युती गरजेची'

Published On: Feb 12 2018 8:23PM | Last Updated: Feb 12 2018 8:23PMत्र्यंबकेश्‍वर : वार्ताहर

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा-सेना युती होणे ही दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  केले.त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्‍वर येथे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी (दि.12) भेट दिली. त्र्यंबकराजाच्या मंदिरात दोघांनी पूजा, अभिषेक केला. सुयोग वाडेकर व वामन गायधनी यांनी पौराहित्य केले. यावेळी विश्‍वस्त कैलास घुले, श्रीकांत गायधनी, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, शहराध्यक्ष श्याम गंगापुत्र, नगरसेवक सागर उजे, बाळा सोनवणे आदी उपस्थित होते. विशस्त कैलास घुले, मुख्याधिकारी डॉ.चेतना केरुरे यांनी स्वागत केले. ना. मुनगंटीवार व केसरकर यांनी मंदिराच्या परंपरेची तसेच पौराणिक माहात्म्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या अधिकार्‍यांच्या कडून घेतली. याप्रसंगी ना. केसरकर म्हणाले की, मागील पंधरा वर्षांत काँग्रेस व राष्ट्रवादीने राज्याचे वाटोळे केले. तेव्हाचा 4.5 टक्क्यांवर असलेल्या विकासाचा दर हा गेल्या तीन वर्षांत 9 टक्क्यांपर्यंत आला आहे. यामुळेच सर्वसामान्य, शेतकरी, दलित, आदिवासी या सर्वांसाठी सरकार उत्तम काम करत असून, ही विकासाची गती वाढविण्यासाठी येत्या आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षाची युती होणे आवश्यक आहे.

कुशावर्त, ब्रह्मगिरी करणार हिरवीगार धार्मिक माहात्म्य असलेले तीर्थराज कुशावर्त व गोदावरी उगमस्थान बह्मगिरी या दोन स्थानांचा विकास करण्यासाठी दोन्ही ठिकाणी दत्तक घेणार असल्याचे सितोवाच ना. मुनगंटीवार यांनी यावेळी केले. तसेच वनसचिवांशी चर्चा करून येथे वृक्ष लागवड करून ब्रह्मगिरी हिरवेगार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. नगरपालिका पुढील नियोजन करणार असून, मुख्याधिकारी डॉ. चेतना केरुरे व नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्याशी शहर विकासाबाबत चर्चा करून विकासाचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही ना. मुनगंटीवार यांनी दिल्या.