Sun, Feb 17, 2019 07:02होमपेज › Nashik › ट्रकच्या धडकेने टोल कर्मचारी ठार

ट्रकच्या धडकेने टोल कर्मचारी ठार

Published On: Dec 16 2017 1:46AM | Last Updated: Dec 16 2017 12:01AM

बुकमार्क करा

घोटी : वार्ताहर

मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी येथील टोल नाक्यावर ओव्हरलोड पावती फाडण्यावरून वाहनचालक व टोल कर्मचारी यांच्यात हुज्जत झाली. यावेळी वाहनांची गर्दी वाढल्याने ओव्हरलोड ट्रक बाजूला घेण्यास सांगितले असता, दारूच्या नशेत ट्रकचालकाने टोल कर्मचार्‍याला जोराची धडक दिल्याने या कर्मचार्‍याचा मृत्यू झाला.

घटनेनंतर संतप्त कर्मचारी व ग्रामस्थांनी टोल नाकाच बंद ठेवला. मृत कर्मचार्‍याची दखल न घेतल्यामुळे प्रोजेक्ट मॅनेजरला संतप्त जमावाने धक्काबुक्की करून मारहाण केली. टोल कर्मचार्‍यांनी पसार झालेल्या वाहनाचा पाठलाग करून ट्रकचालकास घोटी पोलिसांच्या स्वाधीन केले.

याबाबत माहिती अशी की, शुक्रवारी (दि.15) रात्री 12.30 च्या सुमारास ट्रक (एमएच 04 डीएस 7614) ओव्हरलोड कांदा भरून मुंबईच्या दिशेने जात असताना टोल भरण्यासाठी घोटी टोल नाक्यावर थांबविण्यात आला. यावेळी ओव्हरलोड पावती फाडण्याच्या कारणावरून टोल कर्मचारी व ट्रकचालकाची शाब्दिक चकमक झाली. ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.