होमपेज › Nashik › आज नाशिक बंद नाही

आज नाशिक बंद नाही

Published On: Aug 09 2018 1:36AM | Last Updated: Aug 09 2018 1:36AMनाशिक : प्रतिनिधी

सकल मराठा समाज, नाशिक मराठा क्रांती मोर्चातर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असली तरी बंदमधून नाशिक वगळण्यात आले आहे. शहर आणि जिल्ह्यात सर्व व्यवहार सुरू राहणार असून, डोंगरे मैदानावर दिवसभर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय पंचवटी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी अराजकीय समिती, मराठा संघटना, राजकीय मंडळी यांच्या उपस्थितीत पंचवटीतील वरदलक्ष्मी लॉन्स येथेे बैठक घेण्यात आली. क्रांतिदिनी शांतता व संयमाची भूमिका ठेवून कार्यकर्त्यांनी आंदोलन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. दरम्यान, शासनाने दिलेल्या वेळेत प्रश्‍न न सोडविल्यास तीव्र स्वरूपाचे चक्‍का जाम आंदोलन हाती घेण्यात येईल, असा इशारा बैठकीत देण्यात आला.