नाशिक : प्रतिनिधी
उडान योजनेंतर्गत नाशिकहून आज (दि. 23) पुण्यासाठी पहिले विमान झेपावणार आहे. पालकमंत्री गिरीश महाजन सायंकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी ओझर विमानतळ येथे विमानाला हिरवा झेंडा दाखवतील. या सेवेमुळे नाशिक हवाई सेवेने देशाशी जोडले जाणार आहे.
या विमान उड्डाणापूर्वी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात पुण्याला जाणार्या प्रवाशांना शुभेच्छा देण्यात येणार आहेत. या सोहळ्यासाठी एअर डेक्कनचे गोपीनाथ, खासदार हेमंत गोडसे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मुंबई-पुण्यासाठी एअर डेक्कनने ऑनलाइन बुकिंग केले आहे.
स एअर डेक्कन विमान कंपनी उडान योजनेमध्ये नाशिकहून मुंबई आणि पुण्यासाठी सेवा देणार आहे. मुंबईहून पहिले विमान सायंकाळी 6 वाजता ओझर येथे पोहोचणार असून, यावेळी प्रवाशांचे स्वागत केले जाणार आहे. हेच विमान 6 वाजून 20 मिनिटांनी पुण्यासाठी टेकऑफ करणार आहे.