Mon, Jun 17, 2019 05:07होमपेज › Nashik › पक्ष्यांची शिकार करणारे तिघे अटकेत

पक्ष्यांची शिकार करणारे तिघे अटकेत

Published On: Feb 19 2018 1:21AM | Last Updated: Feb 19 2018 12:21AMयेवला : प्रतिनिधी

कुसमाडी येथील राखीव वनक्षेत्रामध्ये शिकारीच्या तयारीत असणार्‍या तिघांना वन कर्मचार्‍यांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून काही जिवंत व मृत पक्षी ताब्यात घेण्यात आले. वन विभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना हा प्रकार उघडकीस आला.

वनविभागाचे वनपाल, वनरक्षक व वनकर्मचार्‍यांचे पथक गुरुवारी (दि.15) 3 वाजेच्या सुमारास कुसमाडी राखीव वनक्षेत्रात गस्त घालत असताना जयवंत याकुब चव्हाण (39), नितीन रामा शिंदे (25), मच्छिंद्र चव्हाण (20, सर्व रा. अनकुटे, ता. येवला) हे पक्ष्यांची शिकार करण्यासाठी नायलॉनचे जाळे लावत असताना दिसून आले. वनविभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. जंगलात इतरही ठिकाणी त्यांनी जाळे लावले होते. 

त्यांच्याकडून एक मृत मोर, दोन जिवंत तितर पक्षी व इतर साहित्य ताब्यात घेतले. दरम्यान, संशयितांना वनविभागाच्या कार्यालयात आणत असताना बोटिंग क्लब क्रॉसिंगवर नाशिकहून येणार्‍या खासगी वाहनाचा वनविभागाच्या वाहनाला धक्का लागून झालेल्या अपघातात संशयितांसह दोघा वनकर्मचार्‍यांना दुखापत झाली.