Tue, Jun 25, 2019 21:59होमपेज › Nashik › नाशिक : चंदनाची तस्करी करणारी टोळी गजाआड

नाशिक : चंदनाची तस्करी करणारी टोळी गजाआड

Published On: Jan 05 2018 5:56PM | Last Updated: Jan 05 2018 5:56PM

बुकमार्क करा
चांदवड : प्रतिनिधी 

मंगरुळ टोलनाक्यावर चंदन तस्करी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली. मालेगाव येथून बेकायदेशीरपणे चंदनाची तस्करी करताना तिघांना अटक केली. नाशिक विशेष गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई करत ३ लाख रुपये किंमतीच्या चंदनासह १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत मिळालेली अधिक माहीती अशी की,‘सिल्वासा येथील एका कंपनीत बेकायदेशीररित्या चंदन घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचुन केलेल्या कारवाईत एका कारमधून चंदनाची तस्करी करणाऱ्या तिघा जणांना ताब्यात घेण्यात आले. त्या तिघांकडून ३ लाख रुपये किंमतीचे १९४ किलो चंदन, ७ लाख रुपये किंमतीची गाडी असा एकूण १० लाख रुपयांचा मुद्देमाल नाशिक विशेष गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हस्तगत केला आहे.