Sun, Jul 21, 2019 16:38
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › आमदार योगेश घोलप यांना धमकी

आमदार योगेश घोलप यांना धमकी

Published On: Apr 22 2018 1:13AM | Last Updated: Apr 21 2018 11:36PMउपनगर : प्रतिनिधी

नाशिकरोड-देवळाली मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार योगेश घोलप यांना धमकी दिल्या प्रकरणी बालाजी फाउंडेशनचा संस्थापक कैलास मुदलियार विरोधात नाशिकरोड पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. आमदार घोलप यांच्या तक्रारीवरून 20 एप्रिल रोजी वाढदिवसाच्या दिवशीच मुदलियारला रात्री 10.30 वाजेच्या सुमारास नाशिकरोड पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर 21 तारखेला 5.30 च्या सुमारास मुदलियारला समज देऊन सोडून देण्यात आले.

10 एप्रिल रोजी शिवसेनेच्या झेंड्याखाली आ. घोलप यांनी टोलमाफीसाठी आंदोलन केले होते. याचा राग येऊन मुदलियारने आ. घोलप समर्थक योगेश देशमुख यांना मोबाइलवर कॉल करून घोलप यांच्या विरोधात शिवीगाळ, अश्लील शब्द, दमबाजी केली. हे बोलणे मोबाइलवर रेकॉर्ड करून देशमुख यांनी आ. घोलप यांना ऐकवले. ही ध्वनिफित ऐकल्यानंतर आ. घोलप यांनी थेट पोलीस उपायुक्‍त श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे कैफियत मांडली. त्यानंतर घोलाप यांनी  नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

 

Tags : nashik, nashik news, shivsena, Yogesh Gholap, Threat,