Sat, Nov 17, 2018 02:20होमपेज › Nashik › नाशिक : गंगापूर धरण बॉम्‍बने उडवायची धमकी

नाशिक : गंगापूर धरण बॉम्‍बने उडवायची धमकी

Published On: Jul 19 2018 11:11PM | Last Updated: Jul 19 2018 11:11PMनाशिक : प्रतिनिधी

नाशिक तालुका पोलिस ठाण्यास गुरुवारी सायंकाळी अज्ञात व्यक्तीने फोन करून गंगापूर धरण बॉम्बने उडवून देणार असल्याची धमकी दिली. त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलिसांचा फौजफाटा गंगापूर धरण परिसरामध्ये सायंकाळपासून बॉम्बची शोधाशोध करीत आहे. 

गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांसह बॉम्बशोधक व नाशक पथकाने शोध घेतला असता, काहीही मिळाले नाही. तरीही धरणावर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.