Thu, Jul 18, 2019 08:21होमपेज › Nashik › दिंडोरीत दोन महिन्यांत मोठा उद्योग येणार 

दिंडोरीत दोन महिन्यांत मोठा उद्योग येणार 

Published On: Dec 28 2017 1:45AM | Last Updated: Dec 28 2017 1:44AM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

मे महिन्यात निमा औद्योगिक संघटनेतर्फे  मुंबईत झालेल्या  ‘मेक इन नाशिक’ कार्यक्रमात 1900 कोटींचे औद्योगिक गुंतवणुकीचे प्रस्ताव निमाकडे प्राप्त झाले होते. हे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आले आहे. सातपूर, अंबडला  औद्योगिकीरणासाठी जागा शिल्लक नसल्यामुळे दिंडोरी तालुक्यातील तळेगाव -अक्राळे येथे एका उद्योग समूहाने 100 एकर जागेची मागणी केली आहे. येत्या दोन महिन्यात मोठा उद्योग (अँकर इंडस्ट्री) होणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. 

गंगापूर रोड येथील किलींगस्टोन क्‍लब येथे निवडक उद्योजकांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिंडोरीतील अक्राळे येथे 500 एकर जमीन भूसंपादित करण्यात आली आहे. तेथे पायाभूत सुविधाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यात फेब्रुवारी महिन्यात औद्योगिकीरणासाठी प्लॉट वाटप करण्यात येणार आहे. ‘मेक इन नाशिक’च्या प्रस्तावावर मुंबईत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हे ‘डी झोन’ मध्ये येत असल्यामुळे इतर ठिकाणांपेक्षा वीज दर कमी असून, याचा लाभ उद्योजकांना मिळत असल्याचे देसाई यांनी सांगितले.

बैठकीस निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, उदय खरोटे, हेमंत राठी, नेमीचंद पोद्दार, अतुल चांडक, विक्रम सारडा, सुनील कोतवाल, उदय घुगे, संदीप आव्हाड, मधुकर ब्राह्मणकर, हेमंत बक्षी, विक्रांत मते, विनोद शहा, वैद्य विक्रांत जाधव, डॉ. नारायण विंचूरकर आदी उपस्थित होते.