Thu, Jan 17, 2019 03:56होमपेज › Nashik › पावसाळ्यात पाणी साचणारी ठिकाणे निश्‍चित

पावसाळ्यात पाणी साचणारी ठिकाणे निश्‍चित

Published On: Jun 06 2018 1:43AM | Last Updated: Jun 06 2018 12:45AMनाशिक : प्रतिनिधी

पावसाळा तोंडावर आल्याने महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून त्या अनुषंगाने विविध भागांत कामे सुरू केली आहेत. नालेसफाई, पावसाचे पाणी साचणारी ठिकाणे, अतिसंवेदनशील ठिकाणे, अतिक्रमणांमुळे अडथळा ठरणारी ठिकाणे व अतिवृष्टी झाल्यामुळे शहरात पाणी साचणारी ठिकाणांची अद्ययावत माहिती तयार करत संबंधित ठिकाणी विविध स्वरुपाची कामे हाती घेण्यात येऊन नियोजन केले आहे. 

पावसाळा सुरू होण्यापूर्वीच महापालिकेची यंत्रणा गेल्या एक महिन्यापासून पावसाळापूर्व कामे करण्यात मग्‍न आहे. नैसर्गिक नाले आणि पाणी साचणारी ठिकाणे निश्‍चित करून संबंधित ठिकाणी या पावसाळ्यात पाणी साचून हानी होणार नाही यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कारण गेल्या पावसाळ्याचा अंदाज घेतला तर मानवनिर्मित अडथळ्यांमुळेच पावसाचे पाणी साचून वित्त व जीवितहानी होण्याचे प्रकार घडले आहेत. शहरासह परिसरातील 10 हजार 991 मीटर लांबी असलेल्या 12 नाल्यांची सफाई मोहीम हाती घेतली असून, आतापर्यंत 1411 मीटरपर्यंत नाल्यांची सफाई पूर्ण झाली असून, अद्याप 4625 मीटर लांबीचे नालेसफाई करणे बाकी आहे. 

पुरामुळे धोका पोहचू शकणारी ठिकाणे

नाशिक पूर्व विभाग :  नासर्डी नदीचा परिसर, मुंबई नाका, भांडी बाजार, सराफ बाजार, नेहरू चौक, गाडगे महाराज धर्मशाळा परिसर, टाळकुटेश्‍वर पुलाजवळील वस्ती, काझी गढी, म्हसोबावाडी. 

नाशिक पश्‍चिम विभाग :  गंगावाडी, जोशीवाडा, घारपुरे घाट, मल्हारखाण, सुंदरनारायण मंदिर, रविवार कारंजा, तेली गल्ली, दत्तवाडी, स्वामीनारायण कोट, मंगल लेन, चित्तपावन कार्यालय, गायधनी लेन, क्रिया कोट, कापड बाजार, बोहोरपट्टी, ओकाची तालीम, दिल्ली दरवाजा, बागडे लेन, पगडबंद लेन, भागवत तबेला, नवा दरवाजा, सोमवार पेठ, तिवंधा गुलालवाडी, मोदकेश्‍वर मंदिर

पंचवटी विभाग :  गोदावरीनगर, गणेशवाडी, श्रद्धा लॉन्स, चतुसंप्रदाय आखाडा, पुरिया रोड, नारोशंकर मंदिर, सरदार चौक, पंचवटी, चिंचबन, कबुतरखाना, मखमलाबाद नाका.

नाशिकरोड विभाग : चेहडी स्मशानभूमीजवळ, साठेनगर, आम्रपाली झोपडपट्टी, सुंदरनगर, नवले चाळ 

सिडको विभाग : नासर्डी नदीलगताच परिसर, यमुनानगर

सातपूर विभाग : आनंदवली, आसारामबापू आश्रम परिसर, महादेववाडी, जगतापवाडी, कांबळेवाडी.

अतिक्रमणामुळे अडथळा ठरणारी ठिकाणे

पूर्वविभागात भांडीबाजार, सराफ बाजार, नेहरू चौक, गाडगे महाराज पूूल, धर्मशाळा परिसर, टाळकुटेश्‍वर पुलाजवळील वस्ती, काझी गढी, म्हसोबावाडी, पश्‍चिम विभागमध्ये गंगावाडी, जोशीवाडा, घारपुरे घाट, मल्हारखाण, पंचवटी विभागात गणेशवाडी, श्रद्धा लॉन्स तसेच सातपूर विभागात महादेववाडी, जगतापवाडी, कांबळेवाडी, गौतमनगर, आयटीआय पूल, आनंदवली, आसारामबापू आश्रम इ.