होमपेज › Nashik › पुनर्वसनाची वेळ येणार नाही : खडसे 

पुनर्वसनाची वेळ येणार नाही : खडसे 

Published On: Jul 28 2018 1:35AM | Last Updated: Jul 28 2018 12:47AMजळगाव : प्रतिनिधी

येथील मनपा निवडणुकीत भाजपा 51 प्लस जागा जिंकणार आहे, असा विश्‍वास प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्‍त केला. तसेच आमदार एकनाथ खडसे यांचे पुनर्वसन योग्य वेळ आली की केले जाईल, असे म्हणताच ती वेळ कधीच येणार नाही, असे खडसेंनी सुनावताच दानवे यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.