Thu, Apr 25, 2019 04:03होमपेज › Nashik › काँग्रेस भवन, सावानावर मालमत्ता जप्‍तीची नामुष्की

काँग्रेस भवन, सावानावर मालमत्ता जप्‍तीची नामुष्की

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षांपासूनची घरपट्टी न भरल्याप्रकरणी मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी शहरातील राजकीय पक्षांसह अनेक बड्या संस्था व प्रतिष्ठित व्यक्‍तींच्या मालमत्ता जप्‍त करण्याची धडक कारवाई हाती घेतली आहे. त्यात काँग्रेस भवन, आयमा, सावाना तसेच, आयसीआयसीआय बँक व भारत संचार निगमच्या कार्यालयाचा समावेश आहे.  

मनपाच्या कर मूल्यनिर्धारण आणि विविध कर विभागाने थकबाकीदारांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. मार्चअखेर 12 कोटी 46 लाख रुपये वसूल करण्यासाठी आतापर्यंत 394 इतक्या मिळकती जप्‍त करण्यात आल्या असून, त्यात अनेक बड्या मालमत्ताधारकांचा समावेश आहे. आयुक्‍त मुंढे यांनी ही कारवाई हाती घेतल्याने त्याचे सामान्य जनतेकडून स्वागत केले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून थकबाकी असूनही अधिकारी आणि काही कर्मचार्‍यांकडून या बड्या हस्तींना पाठीशी घातले जात होते. परंतु, मुंढे यांच्या कारवाईमुळे संबंधित अधिकार्‍यांच्याही पायाखालची वाळू घसरल्याने याच विभागाला आता कारवाईचे पाऊल उचलावे लागत आहे. शहरातील 394 थकबाकीदारांना वॉरंट बजावून जप्‍तीची कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. 

Tags : Nashik, Nashik News, tax department, campaign, against,  defaulters.


  •