Tue, Jan 22, 2019 23:13होमपेज › Nashik › ‘पुढारी’च्या निबंध स्पर्धेचे उद्या पारितोषिक वितरण

‘पुढारी’च्या निबंध स्पर्धेचे उद्या पारितोषिक वितरण

Published On: Jan 19 2018 1:53AM | Last Updated: Jan 19 2018 12:29AMनाशिक : प्रतिनिधी

दैनिक ‘पुढारी’तर्फे इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या निबंधलेखन स्पर्धेच्या नाशिक विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि. 20) आयोजित करण्यात आला आहे. गंगापूर रोड येथील मराठा हायस्कूलमध्ये सकाळी 11.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. 

कार्यक्रमात ‘पुढारी’तर्फे बालदिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील नाशिक विभागातील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण केले जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना वाचन-लेखनाची गोडी लागावी, त्यांची भाषा, लेखनशैली विकसित व्हावी, या हेतूने ‘पुढारी’ने ‘सोनी गिफ्ट्स’च्या सहकार्याने ही स्पर्धा घेतली होती. ‘विद्यार्थ्यांच्या वाचन-लेखन संस्कृतीत मोबाइलचे स्थान काय?’ असा स्पर्धेचा विषय होता.

स्पर्धेत शहरातील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व उपरोल्लेखित विषयावर निबंध लिहून ते दैनिक ‘पुढारी’च्या नाशिक कार्यालयात जमा केले होते. या निबंधांचे शहरातील मान्यवरांनी परीक्षण करून निकाल जाहीर केला होता. त्याचे पारितोषिक वितरण शनिवारी होणार असून, या कार्यक्रमाला नाशिक विभागातील विजेत्यांसह सहभागी स्पर्धक, पालक, शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘पुढारी’ परिवारातर्फे करण्यात आले आहे.