Thu, May 28, 2020 18:22होमपेज › Nashik › कैद्याने अंडरपॅन्ट मध्ये लपवुन आणला गांजा 

कैद्याने अंडरपॅन्ट मध्ये लपवुन आणला गांजा 

Published On: Jun 12 2019 7:53PM | Last Updated: Jun 12 2019 7:58PM
नासिक रोड वार्ताहर

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असणाऱ्या एका कैद्याने न्यायालयीन कामकाज झाल्यावर पुन्हा कारागृहात जाताना चक्क अंडरपॅन्ट मध्ये गांजा लपवून आणल्याची बाब नुकतीच कारागृह प्रशासनाच्या लक्षात आली. करागृह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी याबाबत नाशिक रोड पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून, संशयित कैद्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

11 जून रोजी दुपारी कैदी नंबर 471 सुनील विलास चांगले राहणार हनुमान वाडी पंचवटी याला नाशिक न्यायालयात नेण्यात आले. न्यायालयाचे काम संपल्‍यावर  दुपारी साडेचार ते पाचच्या सुमारास पुन्हा या कैद्‍याला कारागृहात पाठवत असताना कारागृहातील झडती अंमलदार विजयसिंग निकम, गेट किपर रामकिसन बोधने, ज्ञानेश्वर दळवी यांनी संशयित सुनील विलास चांगले याची झडती घेतली. यावेळी त्याने अंडर पॅन्ट मध्ये तंबाखू च्या पुडी मध्ये गांजा ला चिकट टेप लावून अंडर पॅन्ट मध्ये लपवलेला आढळला. संशयिताची झडती घेतली असता, विजयसिंह निकम यांना हा प्रकार उसड झाला. 

या प्रकाराची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर गोरख चव्हाण यांना सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक रोड कारागृहातील तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर गोरख चव्हाण यांच्या तक्रारीवरून सुनील चांगले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नाशिक रोड पोलिस करीत आहेत. यापूर्वी अनेक वेळा नाशिक रोड कारागृहात गांजा सदृश्य नशेच्या वस्तू सापडलेल्या आहेत.