Tue, Jun 18, 2019 20:18होमपेज › Nashik › माँ अन्नपूर्णा माता मंदिराने  त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र परिपूर्ण : सुमित्रा महाजन 

माँ अन्नपूर्णा माता मंदिराने  त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र परिपूर्ण : सुमित्रा महाजन 

Published On: Feb 23 2018 1:18AM | Last Updated: Feb 22 2018 11:50PMनाशिक: प्रतिनिधी

त्र्यंबकेश्वरला अन्नपूर्णा माता मंदिराची प्राणप्रतिष्ठा हा मोठा योग आहे.  शिव  सोबतच शक्तीचेही  मंदिर  झाल्यामुळे त्र्यंंबक तीर्थक्षेत्र परिपूर्ण झाले आहे. यज्ञातून माणसाच्या मानसिक शक्तीमध्ये वाढ होत असल्याचे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष  सुमित्रा महाजन यांनी केले.

त्र्यंबकेश्‍वर येथील नीलगिरी पर्वतावर साकारलेल्या माँ अन्नपूर्णा मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी  त्या बोलत होत्या. व्यासपीठावर सिद्धपीठ श्री अन्नपूर्णा आश्रम चॅरिटेबल ट्रस्टचे  महामंडलेश्‍वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी महाराज, खासदार हेमंत गोडसे,  आ. सीमा हिरे,  त्र्यंबकचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, लक्षचंडी यजमान कैलास घुले, प्राणप्रतिष्ठा यजमान अ‍ॅड. सुनील गुप्ता, जम्मूचे स्वामी हृदयानंदजी, वेरुळचे स्वामी हिरानंदजी,  माँ अन्नपूर्णा प्राणप्रतिष्ठा व लक्षचंडी महायज्ञ समितीचे महामंत्री प्रदीपभाई पटेल, कोषाध्यक्ष रतीश दशपुत्रे  व मुख्य संयोजक श्याम सिंगल आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सर्वप्रथम लक्षचंडी यज्ञ स्थानास भेट दिली तसेच, हवनकुंडाचे विधिवत पूजन करून केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते माँ अन्नपूर्णाच्या 1931 किलो वजन असलेल्या पंचधातूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा यथासांग शास्त्रोक्त पद्धतीने  करण्यात आली. यासोबतच 750 कि.ग्रॅ. वजनाच्या सरस्वती देवीच्या  मूर्तीची  व 470 कि. ग्रॅ. वजनाच्या महाकाली मातेच्या  मूर्तीची स्थापना करण्यात आली.  

महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी महाराज म्हणाले की, माझे गुरु ब्रह्मलीन महामंडलेश्वर श्री 1008 स्वामी प्रभानंद गिरिजी महाराज यांची इच्छा पूर्णत्वास गेल्याचा मला आनंद आहे. जेव्हा आम्ही या कार्याचा आरंभ केला तेव्हा हे कार्य अशक्यप्राय वाटत होते.  ध्यास  व सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे. संसारात सर्वांनाच सदैव सुख, शांती लाभो अशीही कामना त्यांनी केली.

याप्रसंगी मंदिराचे नि:शुल्क काम करणार्‍या अहमदाबादचे वास्तूविशारद सत्यप्रकाश यांचाही  सत्कार करण्यात आला.   प्रास्ताविक मुख्य संयोजक श्याम सिंगल यांनी तर किशोर गोयल यांनी आभार  मानले. कार्यक्रमास  महामंडलेश्वर स्वामी  सच्चिनानंद गिरी, लक्षचंडी आचार्य कल्याणनंद, आचार्य कल्याणदत्त शास्त्री, प्राणप्रतिष्ठा आचार्य बाळासाहेब दीक्षित, स्वामी दिव्यानंद, स्वामी जयंद्रानंद, स्वामी नित्यानंद, स्वामी विजयानंद, पवनजी संघानिया, मनपाचे माजी आयुक्त विलास ठाकूर, सुनंदा जाधव, सनातनजी शर्मा, मनोज जैन आदींसह भाविक उपस्थित होते.

नि:शुल्क काम

याप्रसंगी मंदिराचे नि:शुल्क काम करणार्‍या अहमदाबादचे वास्तूविशारद सत्यप्रकाश यांचाही  सत्कार करण्यात आला. तसेच, मंदिर परिसरात बांधण्यात आलेल्या भक्तनिवासाचेही लोकार्पण सुमित्रा  महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.