Sun, Apr 21, 2019 02:03होमपेज › Nashik › शिक्षक मतदारसंघातील मतदारांचा टक्‍का घसरला

शिक्षक मतदारसंघातील मतदारांचा टक्‍का घसरला

Published On: Jan 12 2018 1:55AM | Last Updated: Jan 11 2018 11:30PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी यंदा मतदार नोंदणीच्या टक्का गतवेळपेक्षा 4 हजाराने घसरल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात यंदा 51 हजार 168 मतदारांची नोंदणी करण्यात आली असून, नाशिक जिल्ह्यात 14 हजार 274 शिक्षक मतदार आहे. दरम्यान, येत्या 19 तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 

येत्या 7 जुलैला नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची मुदत संपत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या मतदारसंघातील निवडणूकीची तयारी म्हणून पहिल्या टप्यात मतदार नोंदणी घेण्यात आली. विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये यासाठी स्थानिक जिल्हा निवडणूक शाखेतर्फे मतदार नोंदणी करण्यात आली. मात्र, या नोंदणीकडे नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांनी पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात यंदा 51 हजार 168 मतदारांची नोंदणी पूर्ण झाली. गत निवडणूकीवेळी 55 हजार शिक्षकांची नोंदणी झाली होती. नाशिक जिल्ह्याचा विचार करता गतवर्षी जिल्ह्यात 15 हजार 56 मतदार होते. यंदा हाच 14 हजार 274  पर्यंत घसरला आहे.

नोंदणीसाठी 1 नोव्हेंबर 2017 पुर्वी नोकरीस असणार्‍या तसेच मागील सहा वर्षापैकी किमान तीन वर्षे अध्यापनाचा अनुभव असणे आवश्यक होते. यादृष्टीने जिल्हा निवडणूक शाखेने नोंदणीसाठी रात्रीचा दिवस केला. मात्र, तरीही शिक्षकांनी या नोंदणीकडे पाठ फिरवली. विभागात 7 जानेवारी रोजी संपलेल्या तिसर्‍या टप्यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 2 हजार 91 मतदारांची नोंदणी करण्यात आली. नगरमध्ये 226, धुळे 486, जळगाव 1654, तर नंदुरबार 221 मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. दरम्यान, अंतिम मतदार यादी 19 जानेवारील प्रसिद्ध केली जाणार आहे. परंतु, घटलेली मतदारसंख्या बघता तसेच इच्छुकांची भाऊगर्दी विचारात घेता निवडणुकीत राजकारण तापण्याची शक्यता आहे.