Mon, Aug 19, 2019 11:07होमपेज › Nashik › ‘कसणार्‍यांच्या नावे सातबारा न निघाल्यास पुन्हा लाँग मार्च’

‘कसणार्‍यांच्या नावे सातबारा न निघाल्यास पुन्हा लाँग मार्च’

Published On: Jun 14 2018 1:34AM | Last Updated: Jun 13 2018 11:26PMसुरगाणा : वार्ताहर

वनजमीन कसणार्‍याच्या नावावर होऊन  कसणार्‍याच्या नावे येत्या तीन महिन्यांत सातबारा  न निघाल्यास पुन्हा एकदा कळवण ते मुंबई असा लाँग मार्च काढून लाल वादळाची ताकद सरकारला दाखवू, असा इशारा आमदार जिवा पांडू गावित दिला. हुतात्मा लक्ष्मण बागुल  यांच्या स्मृतीदिनानिमित्त सुरगाणा तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्चाप्रसंगी केले.

यावेळी डॉ. अशोक ढवळे, किसन गुजर, सुनील मालुसरे, सभापती सुवर्णा गांगुर्डे, उपसभापती इंद्रजित गावित,  सावळीराम पवार, रामजी गावित, भिका राठोड, रमेश वाडेकर, विजय घांगळे, धनजी चौधरी, उत्तम  कडू, मनिषा महाले, नगराध्यक्ष सोनाली बागुल, नगरसेवक  अकील पठाण, राजुबाबा, सुरेश गवळी, सुभाष  चौधरी, धर्मेंद्र पगारीया, कळवणचे हेमंत पाटील, मोहन जाधव, जगन माळी, बाबाजी जाधव, राजाराम गांगुर्डे, वैभव जाधव, निलेश जाधव, उपविभागीय   अधिकारी अमन मितल, तहसीलदार दादासाहेब गिते, गटविकास अधिकारी केशव गड्डापोड, गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर आदीसह सर्व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी गावित म्हणाले, मुंबईच्या मोर्चात मुख्यमंत्र्यांनी सर्व  मागण्यांची पूर्तता येत्या सहा महिन्यांत करण्याचे आश्‍वासन दिले होते.

परंतु तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्याप मागण्या  संदर्भात कोणत्याही  हालचाली सरकार कडून सुरु  झालेल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांनी मुंबईच्या मोर्चा करीता तयार  रहावे. सध्या पात्र दाव्यांची वनजमीनीची मोजणी जीपीआरएसने सुरू आहे.ती दोन हजार पाचच्या गुगल मॅपशी मॅच झाल्यास तेवढी जमीन मिळेल.वनजमीनीची मोजणी करतांना महसूल विभाग,वनविभागाचे कर्मचारी  उपस्ति रहाणे गरजेचे होते. मात्र ते का उपस्थित राहिले नाहीत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

यावेळी कळवण तालुका  माकपचे सेक्रेटरी हेमंत  पाटील यांनी येत्या  निवडणुकीत निम्यापेक्षा जास्त मतदार माकपच्या  पाठीशी ठामपणे उभे  राहतील असे आश्वासन दिले.   वनजमीनीत जेे भाताचे पिक येत नाही त्या जागेवर उत्पन्न  देणारी फळबाग लावावी असे आवाहन प्रकल्प अधिकारी  अमन मितल यांनी केले.  

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत नगराध्यक्षपद मिळालेल्या सोनाली बागूल व त्यात मोलाची भुमिका बजावलेल्या भाजप नगरसेवक सुरेश गवळी यांचे सह शिवसेना व भाजप मधून माकप मध्ये प्रवेश केलेल्या शेकडो कार्यकर्त्यांचा श्रीफळ देवून मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला मोर्चात तीन हजारांहून अधिक    मोर्चेकरी सहभागी झाले होते.  या वेळी विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने सादर केले  या वेळी विभागनिहाय विविध  विकासकामांचा आढावा  घेण्यात आला.