Wed, Jan 23, 2019 19:59होमपेज › Nashik › पानसरेंच्या मारेकर्‍यांची नाशिकमध्ये पोस्टर्स

पानसरेंच्या मारेकर्‍यांची नाशिकमध्ये पोस्टर्स

Published On: Mar 18 2018 1:31AM | Last Updated: Mar 18 2018 1:08AMनाशिक : प्रतिनिधी

कोल्हापूर येथे 2015 मध्ये ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांची गोळ्या झाडून हत्या करणार्‍या संशयितांचे पोस्टर्स नाशिकमध्ये विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत. या मारेकर्‍यांची माहिती देणार्‍यास 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी मारेकर्‍यांच्या छायाचित्राचे पोस्टर्स चिटकवले आहेत. 

फेब्रुवारी 2015 ला कोल्हापूर येथे निवासस्थानी पानसरे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांचा शोध घेण्यासाठी बरेच प्रयत्न केले; मात्र अद्यापपर्यंत त्यांना संशयित शोधण्यात यश आलेले नाही. दरम्यान, मारेकर्‍यांचे छायाचित्र तयार करण्यात आले असून, ते राज्यभरात लावण्यात येत आहेत. नुकतेच नाशिक शहरातही चिकटवण्यात आले असून, संशयितांची माहिती असल्यास ती पोलिसांना द्यावी, असे आवाहन कोल्हापूर पोलिसांनी केले आहे. 

 

Tags : nashik, nashik news, Govind Pansare, ,murder, killers, Posters,