Thu, Nov 15, 2018 05:16होमपेज › Nashik › खडसेंवरील अन्याय संपेल : पाटील 

खडसेंवरील अन्याय संपेल : पाटील 

Published On: Sep 03 2018 1:41AM | Last Updated: Sep 02 2018 10:21PMजळगाव :

राज्यातील एक एक माणसाला आ. खडसे आवडतात. आपल्या भावना मी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवितो. हा अन्याय संपेल, लवकर आपल्याला आनंदाची बातमी मिळेल, असे संकेत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. 

आ. एकनाथ खडसे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अल्पसंख्याक पॉलिटेक्निक कॉलेजच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. या सोहळ्याला ना. दिलीप कांबळे, खा. रक्षा खडसे, आ. राजू भोळे, आ. संजय सावकारे, मोहम्मद हुसेन खान, चित्रसेन पाटील, माजी आमदार गुरुमुख जगवणी, आ. हरिभाऊ जावळे, आ. उदय पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, मध्य प्रदेशचे खा. नंदू चव्हाण, नगराध्यक्ष, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचे सदस्य उपस्थित होते. 

एकनाथ खडसे हे सामान्य माणसांच्या प्रश्‍नांसाठी भांडणारे माणूस आहेत. त्यांनी सामान्य जनतेचे अनेक प्रश्‍न सोडविले. अन्यायाला वाचा फोडली.भाजपाचे सरकार आणण्यात जे पाच ते सात जण आहेत. त्यामध्ये एकनाथ खडसेंचे स्थान मोठे आहे. हा अन्याय लवकरच संपेल, असे पाटील हे म्हणाले  यावेळी आ. एकनाथ खडसे यांनी मनोगत व्यक्त करताना मनातील सल व्यक्त केली.