Mon, Jan 21, 2019 05:20होमपेज › Nashik › नाशिक : महिंद्रा सर्कल पोलीस चौकीतच हॉटेल आणि दारूअड्डा 

नाशिक : महिंद्रा सर्कल पोलीस चौकीतच हॉटेल आणि दारूअड्डा 

Published On: Jun 13 2018 7:42PM | Last Updated: Jun 13 2018 7:42PMसातपूर : प्रतिनिधी

सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये बंद अवस्थेत असलेल्या पोलीस चौकीचे कडी कोयंडा तोडून तेथील स्थानिक व्यक्तीने चक्क या चौकीतच हॉटेल आणि दारूअड्डा सुरू केला आहे. तर या व्यक्तिकडून रात्रीच्या सुमारास मद्यपींना पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचे समोर आले आहे. मात्र यागोष्टीकडे सातपूर पोलीस प्रशासन व अधिकाऱ्याचे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून येत आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपन्याची व कामगार यांच्या  सुरक्षेसाठी सातपूर टाउन पोलीस चौकी सुरु करण्यात आली. मात्र या पोलिस चौकीसाठी कर्मचारी पुरवणे शक्य नसल्याने ही पोलिस चौकी बंद करण्यात आली. याचाच फायदा घेत तेथील एका स्थानिक नागरिकांने चक्क या चौकीतच हॉटेल आणि दारूअड्डा सुरू केला. त्यामुळे सदर चौकीलगत गाड्यावर सुरु करण्यात आलेल्या हॉटेल मध्ये मद्यपींची गर्दी होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे सदर व्यवसायिकांनी हॉटेलसाठी पोलीस चौकी मधून वीजजोडणी घेतली आहे.  यासर्व गोष्टीकडे गस्त घालणाऱ्या पथकाचे अजून देखील लक्ष गेले नसल्याने पोलिसांच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे. 

सातपूर औद्योगिक परिसरात कामगाराची होत असलेली लुट, महिला कामगाराचे चैन स्नेंचीग अशा घटनामध्ये वाढ होत असून या परिसरात पोलिस चौकी कायम स्वरूपी सुरु ठेवणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिक नागरिकातून होत आहे.